सिल्लोड, (प्रतिनिधी) सिल्लोड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे.
दि. १० नोव्हेबरपासून सिल्लोड तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकूण ५४ हजार ८०८ मतदार आहेत. यासाठी ६१ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
ान ाचे १ वर ती नी. न्सी गेंद ात ले
१८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्जाची छाननी होईल. त्यानंतर वैध अर्जाची यादी जाहीर ९ केली जाईल. २५ नोव्हेंबर ही अपील करण्याची अंतिम तारीख आहे. २६ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप होईल. त्याच दिवशी अंतिम ल उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ति २ डिसेंबर रोजी सकाळी इन ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. ३ डिसेंबर
रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. सिल्लोड तहसील कार्यालयात निवडणुकीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
येथे सोमवारपासून सकाळी ११ वाजल्यापासून अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दिली. सिल्लोड नगरपरिषदेच्या हद्दीत १ जुलै २०२५ च्या मतदार यादीप्रमाणे एकूण ५४ हजार ८०८ मतदार आहेत. ६१ मतदान केंद्रे तयार केली असून, प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष आणि तीन मतदान अधिकारी अशी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निलेश उपजिल्हाधिकारी अपार हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. नगरपरिषदेचे नगरसेवकासाठी ३.५० लाखांची खर्च मर्यादा : सिल्लोड नगरपरिषद ब दर्जाची असल्याने नगराध्यक्ष पदासाठी ११ लाख २५ हजार रुपये आणि नगरसेवक पदासाठी ३ लाख ५० हजार रुपये खर्च मर्यादा आयोगाने निश्चित केली आहे. मतदान सुरू होण्याच्या २४ तास आधी प्रचार, जाहिरात, स्पीकर यावर बंदी असेल. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज आहेत. प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी कारभारी दिवेकर हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तहसीलदार सतीश सोनी यांची अतिरिक्त
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. अर्ज दाखल करण्याचे काम सर्व पक्षांच्या वतीने सुरु झाली आहे.














